Home Breaking News Chandrapur@ city news • सावित्रीबाई फुले वसतिगृह प्रकरण व अक्षय भालेराव हत्या...

Chandrapur@ city news • सावित्रीबाई फुले वसतिगृह प्रकरण व अक्षय भालेराव हत्या प्रकरणी वंचित बहुजन महिला आघाडी चे निवेदन

82

Chandrapur@ city news
• सावित्रीबाई फुले वसतिगृह प्रकरण व अक्षय भालेराव हत्या प्रकरणी वंचित बहुजन महिला आघाडी चे निवेदन

चंद्रपूर:- वंचीत बहुजन महिला आघाडी महानगर चंद्रपूर च्या वतीने 9 जून रोजी पोलीस अधीक्षक चंद्रपूर मार्फत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुबंई यांना निवेदन देण्यात आले. त्या मध्ये प्रामुख्याने सावित्रीबाई फुले वसतिगृह मुंबई येथील वार्डन अंधारे आणि कडू याची कसून चौकशी करण्यात यावी तथा नांदेड येथील अक्षय भालेरावं हत्या प्रकरण, या दोन्ही गुन्ह्याचा फास्ट ट्रॅक कोर्टाने खटला चालविण्यात यावा व लवकर न्याय मिळवून द्यावा अन्यथा लवकरच वंचीत बहुजन महिला आघाडी जण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
यात प्रामुख्याने वंचीत बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा तनुजा रायपूरे, महानगर महासचिव मोनाली पाटील, महानगर उपाध्यक्षा सुलभाताई चांदेकर, महानगर उपाध्यक्षा इंदुताई डोंगरे, महानगर उपाध्यक्षा प्रज्ञाताई रामटेके, महानगर उपाध्यक्षा चंद्रप्रभा रामटेके,महानगर उपाध्यक्षा मंजुषा निरंजणे, महानगर सल्लगार शोभा वाघमारे, lमहानगर सल्लागार ललिता दुर्गे, महानगर वॉर्ड शाखा सदस्य विभा पाटील तसेच संपूर्ण शहरातील वॉर्ड शाखा अध्यक्ष महासचिव उपाध्यक्ष सह महिला उपस्थिती होत्या. तसेच ज्योती उंदीरवाडे, अल्का वाळके, ज्योत्स्ना बांबोळे, स्वाती वाळके, उषाताई डोंगरे, राजकला रंगारी, पौर्णिमा रामटेके, तृप्ती उराडे, आशा उराडे, शोभा नरवाडे, पुष्पा साव, दिव्या गोवर्धन, विद्या टेंभरे, विश्रांती डांगे (सल्लागार महानगर ) अश्विनी नरवाडे, प्रीती रामटेके, शोभा वाळके आदी महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मॅडम सोबत चर्चा करून मुली व महिलाची सुरक्षा वाढविण्यात यावी. ही सध्याच्या काळाची गरज आहे हे ठामपणें आपले म्हणणे वंचीत बहुजन महिला आघाडीने मांडले. यां संपूर्ण घटनेचा वंचीत बहुजन महिला आघाडी महानगर चंद्रपूर च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.