Home Breaking News Ghugus city @news • घुग्घुस येथे गायीने खाले बॉम्ब, पूर्ण जबडाच...

Ghugus city @news • घुग्घुस येथे गायीने खाले बॉम्ब, पूर्ण जबडाच फुटला

359

Ghugus city @news

• घुग्घुस येथे गायीने खाले बॉम्ब, पूर्ण जबडाच फुटला

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर :- घुग्घुस येथे पूर्ण जबडा फुटलेल्या अवस्थेतील गाय चे मृत्यू झाले आहे.
चंद्रपूर जिल्हात येणाऱ्या घुग्घुस शहरात धक्कादायक घटना घडली आहे. वन्यजीवांच्या शिकारीसाठी ठेवलेला बॉम्ब एका गायीने खाल्ले होते. या बॉम्बच्या स्पोटमुळे गायीचा जबडा छीन्नविछीन्न झाला होता.

मालकाने या गायीला वाऱ्यावर सोडून दिले होते. गाय शहरातील मार्गांवर फिरताना काहींना दिसली.तिची अवस्था बघून जखमी प्राण्यासाठी धावून जाणाऱ्या चंद्रपूर येथील प्यार फाउंडेशन यांना काहींनी भ्रमणध्वनी ने संपर्क साधून गाई बद्दल माहिती दिली. प्यार फाउंडेशन च्या टीमने गायीला उपचारासाठी हलविले होते. गायीवर दोन दिवस उपचार केले गेले. जखम फार मोठी होती अखेर आज गायीने अखेरचा श्वास घेतला.
शेतात गावठी बॉम्ब ठेवणाऱ्यावर व गायी ला वाऱ्यावर सोडणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.