Home Breaking News आज बल्लारपूर येथे लोकनेत्याला श्रद्धांजली अर्पण करणार

आज बल्लारपूर येथे लोकनेत्याला श्रद्धांजली अर्पण करणार

384

आज बल्लारपूर येथे लोकनेत्याला श्रद्धांजली अर्पण करणार

बल्लारपूर :- राजकीय पक्ष, सामाजिक, सांस्कृतिक संघटनेच्या वतीने आज 17 जून रोजी दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. स्थानिक महात्मा गांधी पुतळा, वस्ती विभाग लोकनेत्याला श्रद्धांजली वाहू या! ही श्रद्धांजली सभा सायंकाळी 6.30 वाजता आयोजित केला आहे.
स्व. बाळुभाऊ मित्र परिवार तर्फे आयोजित श्रध्दांजली सभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, भारतीय रिपब्लीकन पार्टी (गवई), भारतीय रिपब्लीकन पार्टी (खोब्रा.), भारतीय रिपब्लीकन पार्टी (आठवले) पिपल्स रिपब्लीकन पार्टी, ए.आय.एम.आय.एम., बि.आर.एस., बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा, इंटक बल्लारपूर एरिया, हिंद मजदूर सभा, भारतीय मजदूर संघ, सिटू, आयटक, विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, रयत महासंघ, उलगुलान संघटना, इंडियन मेडीकल असोसिएशन, बल्लारपूर बिजनेस असोसिएशन, व्यापारी मंडळ बल्लारपूर, ट्रान्सपोर्ट असोसिएशन बल्लारपूर, केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, संत तुकाराम सेवा मंडळ, संताजी सेवा मंडळ बल्लारपूर, रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर, जे. सी. आय. बल्लारपुर वुड सिटी, लक्ष्य ग्रुप, जे.बी.बी.एस. विदर्भ, बल्लारपूर शहर विकास आघाडी, अमन पसंद कमेटी, भारतीय युथ टायगर संघटना विदर्भ, श्रीराम बालक आखाडा, ओबीसी कृती समिती, कुणबी युवक मंडळ, बल्लारपूर ऑटो असोसिएशन, शक्ती मंच, समस्त पत्रकार संघ बल्लारपूर, सेव टायगर सेव फॉरेस्ट, न्यु क्रिडा असोसिएशन सह आदी राजकीय पक्ष व सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.