Ballarpur city @news
• योग हा जनकल्याण करिता ईश्वरीय कार्य: चंदनसिंह चंदेल
• योग अंगीकृत करणे म्हणजे असाधारण शक्ती धारण करणे: हरीश शर्मा
सुवर्ण भारत:संजय घुग्लोत(सहसंपादक)
बल्लारपुर:२१ जुन आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त भारतीय जनता पक्ष बल्लारपूर च्या वतीने भव्य योग शिबीर व योग नृत्य कार्यक्रम एकदंत लॉन, डॉ. झाकीर हुसैन वॉर्ड, बल्लारपूर येथे आज आयोजीत करण्यात आला. कार्यक्रमाचा शुभारंभ भारत माता च्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाला. रोज करो योग करो या उद्घोषाने संपूर्ण परिसर उत्साह व ऊर्जेने परिपूर्ण झालं.या कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी प्रत्येक भागातून भव्य सहभाग नोंदवून अत्यंत उत्साहाने आनंदमय वातावरणात योग दिवस साजरा केला.
प्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेता वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंह चंदेल यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना योग हि प्राचीन भारताची पारंपरिक कला असुन बाबा रामदेव यांनी या कलेला संपूर्ण आत्मसात करून जनकल्याण करिता ईश्वरीय प्रसाद म्हणुन याचा प्रचार व प्रसार आपल्या देशात केला.या योग कलेची जाणीव ठेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्व पटलावर एक दिशा देऊन संपूर्ण विश्वात वसुदेव कुटुंबकम या भावनेतुन आजचा २१ जुन ही तारीख विश्व संघा कडून आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित करून हिमालय ऊंची गाठली. योग हा आपल्या जीवनाचा नित्यक्रम असला पाहिजे व सर्वांनी याला आत्मसात करून आपलं जीवन निरोगी व सुदृढ करूया असे प्रतिपादन आदरणीय बाबूजी यांनी केले.
बल्लारपूर नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी याप्रसंगी योग हा आजच्या मानवीय जिवनात अविभाज्य घटक असलाच पाहिजे असे मत व्यक्त केले.योग शारीरिक, मानसिक रित्या सशक्त करतो व यामुळे आपल्या शरीरात असाधारण ऊर्जेचा संचार असतो ज्यामुळे आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. प्रत्येकाने योग करून आपल्या जीवनात एक नवीन चैतन्य निर्माण करावे असे प्रतिपादन यावेळी आदरणीय हरीश भैय्या यांनी केले.या प्रसंगी मंचावर काशिनाथ सिंह भाजपा शहराध्यक्ष बल्लारपूर, गोपाल रेड्डी,सौ.वैशाली जोशी,श्रीमती गंगाताई मल्लोजवार,सौ वंदना गोगुलवार,सौ विना झाडे,श्रीमती विजेता आर्य, शैलेश लोडिया व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात भाजपा नेता,शक्तिकेंद्र, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ता, भाजयुमो,पतंजली योग परिवार,लोकमत सखी मंच, रोटरी क्लब,जेसीआय, सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक तरुण उत्साही क्रीडा मंडळ व अनेक युवा कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून यशस्वी केला. कार्यक्रम आयोजन समितीचे संयोजक इंजी.देवेंद्र वाटकर, सहसंयोजक बिरेंद्र श्रीवास, ऋषिपाल गेहलोत, प्रमोद रामिल्लावार, मिथलेश खेंगर,अजहर शेख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन किशोर मोहुर्ले व आभार प्रदर्शन सतीश कनकम यांनी केले.
