Chandrapur @news
• चंद्रपूर पडोली जवळ ट्रक च्या धड़केत चार जन जागेत मुत्यु
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर : बोलेरो चारचाकी वाहन दुभाजकावर उभ्या ट्रकला धडकून यात मारेगाव येथील चार जन जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवार ला दुपारी 2 वाजता चे दरम्यान, चंद्रपूर-पडोली -घुगूस मार्गांवरील अहमद लॉन चिंचाळा जवळ घडली. या भीषण घटनेने मारेगावकर शोककळा पसरली आहे.
यूसुफ नबीवस्ताद शेख, पत्नी मुमताज यूसुफ शेख, रफीक नबीवस्ताद शेख, पत्नी संजीदा रफीक शेख रा. मारेगाव यांचा भीषण अपघातात ठार झाले आहे. यात शानू ऑटोमोबाईल्स व सानिया कोल्ड्रिंक हाऊसचे संचालक असल्याचे माहिती आहे.
हे कुटुंब काल गुरुवार ला आपल्या नातेवाईकांच्या लग्न कार्याप्रसंगी राजुरा (चंद्रपूर) येथे गेले होते. ते मारेगावकडे परत येताना बोलेरोचा टायर फुटल्याने वाहन क्रमांक एम.एच.29 बि. सी. 6321 ने पडोली घुग्गुस मार्गांवरील नागाळा जवळ हे वाहन अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येणाऱ्या ट्रकला जोरदार धडकल्याने बोलेरो वाहनाचा चेंदामेदा झाला. या अपघातात मारेगाव येथील दोन सख्ख्ये भाऊ व त्यांच्या अर्धांगिनी जागीच ठार झाले.
अपघात एवढा भीषण होता की, वाहनाचे प्रत्येक भाग गॅस कटरने कापून मृतकांना बाहेर काढण्याचे नियोजन सुरू युद्ध पातळीवर चालू होते. दरम्यान, मृतक थोरला भाऊ रफीक शेख यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आहे तर लहान भाऊ युसूफ शेख यांचे पाठीमागे दोन मुली आहे.
