Home Breaking News Ballarpur city @news • कु. स्पंदन मेश्राम व कु. पारुल निमजे नवोदय...

Ballarpur city @news • कु. स्पंदन मेश्राम व कु. पारुल निमजे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थांचा सत्कार

68

Ballarpur city @news
• कु. स्पंदन मेश्राम व कु. पारुल निमजे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थांचा सत्कार

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर :-नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थांचा सत्कार ना.सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे करण्यात आले.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मध्ये शहरासाठी 20 टक्के तर ग्रामीण विभागासाठी 80 टक्के राखीव असते. अशा परिस्थितीत ही परीक्षा बल्लारपूर शहरातून कु. स्पंदन पवन मेश्राम व कु. पारुल योगेश निमजे या दोन विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या सुयश बद्द्ल येथील श्री.सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे त्यांच्या व पाल्यांचा सत्कार 24 जून रोजी करण्यात आले.
बल्लारपूर येथील वरिष्ठ पत्रकार श्रीनिवास उनिवा व सुनील टडम यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ना. सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री यांनी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन व शुभेच्छ संदेश पाठविले. या सत्कार कार्यात बल्लारपूर शहराचे वरिष्ठ पत्रकार श्रीनिवास उनिवा, श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर , सुधाकर सिक्का, श्रीनिवास पिसार, कमल वर्मा, नारायण सुक्का , विनोद कोवे , सतीश बोकुरी उजव बुझाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.