Home Breaking News • बल्लारशाह रेल्वे स्थानकाचा पूल प्रवाशांसाठी सुरू झाला अजय दुबे यांच्या प्रयत्नांना...

• बल्लारशाह रेल्वे स्थानकाचा पूल प्रवाशांसाठी सुरू झाला अजय दुबे यांच्या प्रयत्नांना यश

110

Ballarpur dist@ news

• बल्लारशाह रेल्वे स्थानकाचा पूल प्रवाशांसाठी सुरू झाला अजय दुबे यांच्या प्रयत्नांना यश

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर : ५ महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद असलेला बल्लारशाह रेल्वे स्थानकाचा फूट ओव्हर ब्रिज २६ जून रोजी सकाळी ११ वाजल्या पासून प्रवाशांच्या सेवेत सुरू झाला असून, प्रवाशांच्या वाहतुकी साठी पाच नंबर प्लेटफार्म हा एकमेव नवीन पूल होता. प्रवाशांची अडचण होत होती त्याला लवकर सुरू करण्यासाठी अजय दुबे, सदस्य, राष्ट्रीय रेल्वे ग्राहक सल्लागार परिषद, रेल्वे मंत्रालय, नवी दिल्ली यांची सातत्याने पत्र व्यहावार करण्यात आले.

या कार्यासाठी महाराष्ट्राचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर,रेल्वे मंत्रालय नवी दिल्लीचे नीरज शर्मा, मध्य रेल्वे मुंबईचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी, मध्य रेल्वे नागपूरचे तुषारकांत पांडे, सीनी, डीईएन यांचे अनेक आभार. आशुतोष श्रीवास्तव, सिनी डेन पद्मनाभ झा, बल्लारशाहचे एईएन सुबोध कुमार यांच्यासह सर्व रेल्वे अधिकाऱ्यांना अजय दुबे आभार मानले.

पुलाच्या उद्घाटनाच्या वेळी स्टेशन अधीक्षक नंदनवार, आरपीएफ निरीक्षक सुनील कुमार पाठक, कमर्शियल इन्स्पेक्टर मिश्रा, मिथिलेश पांडे जिल्हा सरचिटणीस बीजेवाय एम, सुजित निर्मळ जिल्हा सरचिटणीस भाजपा उत्तर भारतीय, संदीप पोडे जिल्हा उपाध्यक्ष बीजेवायएम, श्रीकांत उपाध्याय विदर्भ प्रदेश सचिव भाजपा कामगार मोर्चा, शेख करीम जिल्हा उपाध्यक्ष भाजपा कामगार मोर्चा, अशोक सोनकर जिल्हा सचिव भाजपा कामगार मोर्चा, अभिनेश पांडे, युगल मेहंदळे, जि.प. बुधराज निषाद आदींची प्रमुख उपस्थिती होती.