Home Breaking News Ghugus city@ news घुग्घुस शहरात अक्षय भालेराव हत्याकांड निषेधार्त मोर्चा.

Ghugus city@ news घुग्घुस शहरात अक्षय भालेराव हत्याकांड निषेधार्त मोर्चा.

408

Ghugus city@ news

घुग्घुस शहरात अक्षय भालेराव हत्याकांड निषेधार्त मोर्चा

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस:महामानव ड्रा.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हनुन नांदेड जिल्ह्य़ातील बोंढार (हवेली) गावातील भीमसैनिक अक्षय भालेराव या तरुणाची जातीवाद्यांनी निघूर्ण हत्या केली.तसेच अक्षय भालेराव यांच्या आई,वडील व भावाला बेदम मारहाण करून त्यांचा घरावर दगडफेक केली.
त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ आज दि.३० जून शुक्रवार सकाळ ११:३० वाजता रोजी घुग्घुस शहरातील बौद्ध बांधवांनी शांत मोर्चा काढण्यात आले.

घुग्घुस पंचशील चौकातून मोर्चा सुरुवात झाली,त्याअगोदर तथागत गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर व शहिद भीमसैनिक अक्षय भालेराव यांना अभिवादन करण्यात आले.पंचशील चौक ते नवनिर्माण महामानव ड्रा.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात एकत्रित नागरिक होऊन शांती मार्च ने मोर्चा पार पाडला.

बौद्ध समाज बांधवानी घुग्घुस पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख तसेच तहसिलदारला तहसिल कार्यलयात निवेदनातून तरुणाची हत्या करणाऱ्याला समाजकंटकांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे,तसेच अक्षय भालेराव यांची केस फास्ट ट्रॅक कोर्टात यांची सुनावणी करण्यात यावी,कुटुंबीयांना केन्द्र सरकार तसेच राज्य सरकारने १ करोड रुपयांपर्यंत आर्थिक सहयोग करावे,कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी, जेणेकरून त्यांचा कुंटुबीयांना सन्मानाने जगता येईल.

या प्रमुख मागण्या समाज बौद्ध बांधवाने शांती पूर्वक, शांती मार्च काढून मा.राष्टपती भारत सरकार,मा. पंतप्रधान भारत सरकार,मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रदेश यांचा मार्फत देण्यात आले.