Home Breaking News Buldana jilha@ news • समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा अपघात • बस पेटल्याने...

Buldana jilha@ news • समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा अपघात • बस पेटल्याने 22 प्रवाशांचा जळून मृत्यु.

248

Buldana jilha@ news
• समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा अपघात
• बस पेटल्याने 22 प्रवाशांचा जळून मृत्यु.

बुलडाणा : जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील पिम्पलखुटा गावांनजिक समृद्धि महामार्गावर खाजगी लक्झरी बस ला अपघात होऊन आग लागल्याने आगित अंदाजे 22 लोकांचा आगित होरपळून मृत्यु झाला मृतकामध्ये 4 मुलांचा ही समावेश असल्याचा प्राथमिक अन्दाज आहे. खाजगी विदर्भ ट्रैवल्स बस क्रमांक एम एच 29 बी ई 1819 ही 30 जून रोजी सायंकाळी 5 वाजता नागपुर वरुन पुणे च्या दिशेने जात होती.

1 जुलै च्या रात्रि 1.22 वा खाजगी धावत्या ट्रेवल बस चे समोरिल टायर अचानक निघाल्याने सदर खाजगी बस समृद्धि महामार्गावरिल पुलावरिल दुभाजकाला धड़कुन पलटी झाली. पलटी झाल्याने काही मिनिटातच ट्रैवल्स बस ने पेट घेतला त्यानन्तर काही मिनिटात बस चां भयानक स्पोट होऊन सम्पूर्ण खाजगी बस जळून खाक झाली. या बस मधील 20 ते 22 प्रवाशांचा जळून मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती सामोर आली आहे.
ही खाजगी ट्रैवल्स कारंजा येथे जेवन्यासाठी थाम्बली होती. कारंजा येथे इंटर चेंज करून पुण्याला जाण्यासाठी समृद्धि महामार्गावर मार्गस्थ झाली होती.

अपघाताची माहिती मिलताच पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटना स्थली दाखल झाले.फायर ब्रिगेड च्या वाहनाने ट्रैवल्स ला विझविन्यात आले.ट्रैवल्स मधील प्रवाशांचा होर्पळून मृत्यु झालेल्या मृत देह बाहेर काढन्याचे कार्य प्रशासना कडून उशीरापर्यंत सुरु होते.