Home Breaking News Ghugus city@ news • प्रियदर्शिनी कन्या विद्यालय घुग्घुस शाळा प्रवेशोत्सव...

Ghugus city@ news • प्रियदर्शिनी कन्या विद्यालय घुग्घुस शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

316

Ghugus city@ news

• प्रियदर्शिनी कन्या विद्यालय घुग्घुस शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी
✍️ पंकज रामटेके

घुग्घुस: दि.३० जून रोजी श्री.साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित प्रियदर्शिनी कन्या विद्यालय, घुग्घुस ता.जि.चंद्रपूर येथे शाळा प्रवेशोत्सव दिन संपन्न झाला.
यावेळी नवागत विद्यार्थ्याचे ढोल,ताशांच्या गजरात पुष्पगुच्छ देवुन, मिठाई चारुन स्वागत करण्यात आले.तसेच वर्ग ५ वी ते ८ वी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, नोटबुक व लेखन साहित्य विकरीत करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य अनू खानझोडे, प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक फाल्गुन खामणकर, प्रा.संजय बाबरे, प्रा.वैशाली जोशी,श्री.विनायक टोंगे सह पालक वर्गातील विद्यार्थ्यांनीची मोठी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन बलवंत विखार यांनी तर प्रा.प्रकाश सातार्डे यांनी आभार मानले.