Home Breaking News Bhadravati taluka@ news • भद्रावतीत गुरू पोर्णिमेच्या पर्वावर संगीत मैफिलचे आयोजन

Bhadravati taluka@ news • भद्रावतीत गुरू पोर्णिमेच्या पर्वावर संगीत मैफिलचे आयोजन

317

Bhadravati taluka@ news
• भद्रावतीत गुरू पोर्णिमेच्या पर्वावर संगीत मैफिलचे आयोजन

✍️ मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती : गुरुपौर्णिमेच्या पर्वावर स्वर्गीय सिंधुताई व महादेवराव लक्ष्मण पावडे यांच्या स्मृती पित्यर्थ संगीत मैफिलीचे आयोजन सोमवार दिनांक ३ जुलैला रात्री ८ वाजता केलेले आहे. या मैफिलीमध्ये पुणे येथील प्रसिद्ध संगीत कलावंत पंडित बाळासाहेब वाईकर, निवृत्ती धाबेकर, पांडुरंगजी पवार मैफल सादर करणार आहे. यावेळी चंद्रपूरचे माजी पोलीस उपाधीक्षक श्रीराम तोडासे, सह्याद्रीचा राखणदारचे वरिष्ठ संपादक तथा स्तंभलेखक डॉ. यशवंत घुमे व भद्रावती नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

भद्रावती येथील साईकृपा क्लिनिक व महादेव मेडिकल (बाजार वार्ड) यांच्या सौजन्याने जय गुरुदेव लाॅन (बगडे वाडी) येथे आयोजित या संगीतमय मैफीलीचा शहरातील व परिसरातील संगीतप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. मयुरा अवताडे, दशरथ पावडे, सोनाली व सचिन पावडे यांनी केले आहे.