Home Breaking News Bhadravti news@ news • कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीत टिप्परने टाकलेल्या मातीखाली...

Bhadravti news@ news • कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीत टिप्परने टाकलेल्या मातीखाली येऊन कामगाराचा मृत्यू • टिप्पर चालकावर गुन्हा दाखल. • कंपनीच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह ?

501

Bhadravti news@ news
•कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीत टिप्परने टाकलेल्या मातीखाली येऊन कामगाराचा मृत्यू
•टिप्पर चालकावर गुन्हा दाखल.
•कंपनीच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह ?

✍️ मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती :- भद्रावतीतील कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीतील एका खाजगी कंपनीत कामं करण्या-या टिप्परने टाकण्यात येणा-या मातीच्या ढिगा-याखाली दबून एका कामगाराचा मृत्यू झाल्या ची घटना घडली.या प्रकरणी पोलिसांनी टिप्पर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
विनोद बरडे वय 45 रा.बरांज असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नांव आहे.
कर्नाटक एम्टा कोळसा खाणीत आर टी एम या कंपनी ला मातीचे उत्खनन करण्याचे कामं दिले आहे. हा कामगार तिथे वाहनाला दिशा दाखवण्याचे कामं करत होता. घटनेच्या दिवशी तो कर्तव्य पार पाडत असताना एका टिप्पर चालकाने तो उभा असलेल्या जागेवर मातीचा ढिगारा टाकल्याने त्यात दबून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पहाटे भद्रावती पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार बिपिन इंगळे यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली असता कामगार नेत्यांनी मृत्यू झालेल्या कामगाराच्या नातेवाईकांना आर्थिक मोबदला द्यावा या करिता घेराव घातला होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.त्यामुळे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृत्यू देह ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला व यातील आरोपी टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. पुन्हा एकदा कंपनी चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्यामुळे कंपनीच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.