Home Breaking News Chandrapur dist@ news • नंदू गट्टूवार यांची राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ संपर्क...

Chandrapur dist@ news • नंदू गट्टूवार यांची राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ संपर्क प्रमुख पदी नियुक्ती

203

Chandrapur dist@ news
• नंदू गट्टूवार यांची राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ संपर्क प्रमुख पदी नियुक्ती

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेची अखिल भारतीय बैठक पटणा ( बिहार)येथे 1 व 2 जुलै संपन्न झाली .सदरहु बैठकीत विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील नदुं गट्टूवार यांची सर्वानुमते “राष्ट्रीय बजरगं दल विदर्भ सपंर्क “प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली . आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद संस्थापक व अध्यक्ष हिंदु ह्दयसम्राट डाॅ.प्रविणभाई तोगडिया व आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद महाराष्ट्र प्रदेश महामंत्री किशोर दिकोंडवार यांच्या मार्गदर्शाना खाली नंदू गट्टूवार हे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय बजरंग दलच्या माध्यमातून लोकांना एकत्रित करून संघटना बळकट करण्याच्या सातत्याने प्रयत्न करीत आहे. मागिल काळात त्यांनी जनहिताचे प्रश्न उचलून ते मार्गी लावले होते. हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील अनेक युवक‌ – युवती त्यांच्या नेतृत्वाखाली गावा गावात कार्यरत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत व त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाने त्यांची विदर्भ संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली आहे .

आगामी काळात ही संघटना विदर्भातील सर्व जिल्हा, शहर तालुका, व गाव पातळीवर पोहचवण्याचा आपला संकल्प राहील असे नंदु गट्टूवार या वेळी बोलताना म्हणाले.त्यांच्या नियुक्तीचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.