Home Breaking News Ghugus city@ news • घुग्घुस वियानी विद्या मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन...

Ghugus city@ news • घुग्घुस वियानी विद्या मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन • भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोगळे होते प्रमुख उपस्थित

415

Ghugus city@ news
• घुग्घुस वियानी विद्या मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

• भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोगळे होते प्रमुख उपस्थित

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्गुस : वियानी विद्या मंदिर शाळेच्या शैक्षणिक सत्र २०२३-२४ (ICSE) ला दि.४ जुलै २०२३ पासून प्रारंभ होत आहे. या निमित्तानं, शाळेत “विद्यारंभ” नावाने सुंदरशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शुभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आवर्जून उपस्थित होते.

ग्रामगीतेच्या माध्यमातून वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहिलयं की “या कोवळ्या कळ्यांमाजि लपले रविंद्र ज्ञानेश्वर शिवाजी विकसता प्रगटति समाजी शेकडो महापुरुष।।” अगदी हेच अनुभव मला आजच्या निमित्तानं होत आहे. याठिकाणी आलेला प्रत्येक चिमुकला उद्याच्या उज्ज्वल भारताचा भविष्य आहे. बालवयापासूनच उत्तम शिक्षण आणि संस्कार मुलांवर करणे हे शिक्षकांबरोबर पालकांचेही आवश्यक कर्तव्य आहे. चांगले सुसंस्कारी मुले-मुली हीच आपली खरी संपत्ती आहे. त्यामुळे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक तसेच पालकांनीही लक्ष घातले पाहिजे. मुलांना वेळोवेळी योग्य-अयोग्याची जाणिव करुन दिली पाहिजे. यासोबतच विद्यार्थी मित्रांनीही सकारात्मक दृष्टिकोन बाळगून यशाला गवसणी घालण्यासाठी भरपूर अभ्यास करावा. तुमच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी माझ्या अनेक शुभेच्छा! अशी भावना भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी बोलताना व्यक्त केली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक फादर शैजू, उपमुख्याध्यापिका सिस्टर मीनी, शिक्षिका सौ. संगीताताई थेरे, जार्ज सर आदींसह नवप्रवेशित चिमुकल्यांची पालकांसह उत्साही उपस्थिती होती.