Home Breaking News Ghugus city@ news • लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योगात अस्थायी...

Ghugus city@ news • लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योगात अस्थायी कर्मचारी सेवानिवृत्त कार्यक्रम

492

Ghugus city@ news

• लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योगात अस्थायी कर्मचारी सेवानिवृत्त कार्यक्रम

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस :घुग्घुस येथील लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योगात अस्थायी कर्मचारी श्री.मधुकर निखाडे यांच्या दि.४ जुलै २०२३ मंगळवार रोजी सेवानिवृत्त झाले.
कंपनीच्या रा.मटेरीयल विभागात मधुकर निखाडे कार्यरत होते व त्या विभागाचा प्रमुख, स्टाफ, स्थायी, अस्थायी कर्मचारांने सेवानिवृत्त मधुकर निखाडे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

माणसाचे आयुष्य हे एका खेळासारखे आहे. प्रत्येक पायरीवर ते कठीण होत जाते तसेच मजेशीरही होते. आयुष्याचा प्रत्येक टप्पा माणसाला नवीन अनुभव देतो. लहानपणापासून ते म्हतारपणापर्यंत हे अनुभव आपल्याला मिळतच जातात.

असाच आयुष्याच्या खेळाचा एक टप्पा म्हणजे वा सेवानिवृत्ती. आयुष्याचा हा टप्पा माणसाला खूप काही शिकवतो. ज्या कामासाठी आपण आपले पूर्ण आयुष्य वाहिले ते काम आता कायमचे सोडायचे ह्या विचाराने देखील जीव गुदमरून जातो.

पण वा सेवानिवृत्ती दिवशी आपल्या जिवलगांच्या तसेच सहकाऱ्यांच्या सांत्वनाने व शुभेच्छांनी मनाला थोडा आधार भेटतो. अशाच काही सुंदर सेवानिवृत्ती शुभेच्छा देतो. जे तुमच्या नातेवाईकांना, जिवलगांना, कुटुंबातील व्यक्तींना आधार देतील.
असे वरिष्ठ व विभागाचे प्रमुखानी आपल्या मनोगतुन विचार व्यक्त केला.