Home Breaking News Gondpipri taluka@ news • तोहोगावतील तीन मुल वर्धा नदीत बुडाले

Gondpipri taluka@ news • तोहोगावतील तीन मुल वर्धा नदीत बुडाले

258

Gondpipri taluka@ news
• तोहोगावतील तीन मुल वर्धा नदीत बुडाले

✍️ पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी

गोंडपिपरि :- गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे 3 मुले बुडाल्याने गावात खळबळ उडाली आहे.

तोहोगाव येथील 4 मुले वर्धा नदीच्या तीरावर मासेमारी करण्यासाठी गेले होते. प्रतीक नेताजी जुनघरे वय 11, निर्दोष ईश्वर रंगारी वय 10, सोनल सुरेश रायपुरे वय 9 व आरुष प्रकाश चांदेकर वय 11 हे वर्धा नदीच्या दिशेने पोहायला व मासे पकडण्यासाठी गेले होते. मासे पकडायचे असल्याने तिघे खोल पाण्यात उतरले, पाण्याच्या अंदाज न आल्याने त्यांचा तोल बिघडला व तिघेही नदीत बुडाले.

आरुष चांदेकर याच्या लक्ष्यात येताच तो धावत पळत मदतीसाठी गावात पोहचला असता त्यांनी सर्व बाब गावकऱ्यांना सांगितली, गावकऱ्यांनी लगेच नदीच्या दिशेने गेले असता त्यांनी सर्वत्र तिघांचा शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, बचाव दलाला पाचारण करण्यात आले आहे. नदीचा प्रवाह जोरात असल्याने तिघांचा शोध लागला नाही. तिघे ही नदीत बुडाल्याची माहिती कुटुंबांना मिळाल्यावर आई-वडिलांनी एकच टाहो फोडला.