Home Breaking News ◻️🔸काव्यकुंज🔸◻️ “संपू दे अंधार सारा”

◻️🔸काव्यकुंज🔸◻️ “संपू दे अंधार सारा”

106

◻️🔸काव्यकुंज🔸◻️
“संपू दे अंधार सारा”

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

◻️♦️◻️संपू दे अंधार सारा
वाहू दे ज्ञानाचा वारा
सर्व होता सुशिक्षित. वेगळाच तो नजारा //१//

◻️♦️◻️संपू दे अंधार सारा
मानवास समजावे
एकतेचे ते महत्व
सहकार्या ला जपावे //२//

◻️♦️◻️संपू दे अंधार सारा
होऊ दे सत्याची उषा
असत्याचा नायनाट
जाऊ दे सर्व निराशा //३//

◻️♦️◻️अविचारी दुनियेत
व्हावे विचारांचे वारे
क्रांती नवी घडवूनी
तेजोमय होऊ सारे //४//

◻️♦️◻️संपू दे अंधार सारा
सुख लाभू दे सर्वांना
आहे आयुष्य सुंदर
ठेव आनंदी तु मना //५//

◻️🔸◻️कुमारी मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं काव्यकुंज सदस्य ठाणे◻️