Ballarpur taluka@ news
• बामनी येथे स्व.खासदार बाळु धानोरकर जयंती निमित वृक्षरोपण
✍️पारिश मेश्राम
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
बल्लारपूर :- तालुक्यातील बामणी येथे स्व.खासदार बाळु धानोरकर जयंती निमित वृक्षरोपण चा कार्यक्रम 9 जुलै घेण्यात आला.
या निमित्त स्व. खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश सदस्य घनश्याम मूलचंदानी, तालुका काँग्रेस अध्यक्ष गोविंदा उपरे, सरपंच प्रल्हाद आलम, उपसरपंच सुभाष ताजने यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रामुख्याने सदाशिव जीवतोडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विनायक साळवे, सत्यशिला साळवे, वसंत साळवे, जिल्हा महिला काँग्रेस महासचिव सत्यशीला साळवे, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष अफसाना सय्यद, संजय गोंधळी, लता घुंगरूडकर, सविता मुसळे, अनिता गेडाम, विजया मडावी,संजय गोंधळी,स्वप्निल बोरकर कार्तिक जीवतोड़े, रवी डेरकर ,प्रकाश मोरे, सुरेश बप्पनवार, पंकज राठोड, रोशन आदी उपस्थित होते. प्रास्तविक सुनीता वाघमारे, संचालन रेखा रामटेके यांनी केले. या नंतर ग्रामपंचायत परिसरात वृक्ष रोपण करण्यात आले.
