Home Breaking News Chandrapur@ dist news • राजेंद्र वैद्य यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या “राष्ट्रवादी पक्ष निरीक्षक”...

Chandrapur@ dist news • राजेंद्र वैद्य यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या “राष्ट्रवादी पक्ष निरीक्षक” पदाची अतिरिक्त जवाबदारी.

270

Chandrapur@ dist news
• राजेंद्र वैद्य यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या “राष्ट्रवादी पक्ष निरीक्षक” पदाची अतिरिक्त जवाबदारी.

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील आठवड्यात मोठी उलथापालथ होवून पक्षाच्या एका गटाने पक्षाशी बंडखोरी करीत अजित पवार यांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकार मध्ये जाण्याचा निर्णय घेतला,राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी झाला त्यात गडचिरोली जिल्ह्यातील आमदार धर्मरावबाबा आत्राम हे देखील मंत्री झाले, त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांसह, महिला अध्यक्षा,युवक व इतर अनेक पदाधिकारी हे धर्मरावबाबा आत्राम यांच्या सोबत गेले.पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राजेन्द्र वैद्य यांना गडचिरोली निरीक्षक पदी नियुक्ति केली. जिल्हाध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार,माजी जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार,विद्यमान जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे,माजी जि.प.सभापती जगन्नाथ पाटील बोरकुटे,गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार,वडस्याचे श्याम घाईत,अलापल्लीचे इरफान पठाण,संजय कोचे, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शरद पवार नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षाचे काम करणार अशी माहिती राजेंद्र वैद्य यांनी दिली.