Ballarpur taluka@ news
• विसापूर नजीकच्या “त्या” स्वागतगेट बांधकामाची राजू झोडेंनी केली चौकशीची मागणी !
✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
चंद्रपूर: स्वागत गेटसाठी आराखडा तयार करून शासनाचे करोड रुपये डुबविणाऱ्या त्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी तदवतचं सदरहु बांधकामाची योग्य चौकशी करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे अश्या आशयाची मागणी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे. बांधकामात झालेल्या निकृष्ट दर्जाचे साहित्य व अकुशल कामगारांकडून केलेले बांधकाम यास कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी आज केला आहे. स्वागत गेटच्या बांधकामात अधिकाऱ्यासह नेत्यांचाही आर्थिक लाभ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. उपरोक्त बांधकामाची त्वरित चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून दिला आहे.




