Home Breaking News Chandrapur city@ news • वंचित बहुजन आघाडीचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा

Chandrapur city@ news • वंचित बहुजन आघाडीचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा

558

Chandrapur city@ news
• वंचित बहुजन आघाडीचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा

✍️ संजय घुग्लोत
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर :- वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर (पूर्व व पश्चिम) व महानगर चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने दलित, मुस्लिम, ओबीसी, भटके, आदिवासी, अल्पसंख्यांकावरील पोलीस व धर्मांध शक्तीकडून होणाऱ्या अत्याच्याराच्या विरोधात १३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात जरीन खानचा पोलीस कोठडीत खून करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक करून निलंबित करावे, जरीन खानच्या कुटुंबीयांना ५० लाखाची शासकीय आर्थिक मदत मिळावी यासह अन्य मागण्याचा समावेश आहे. मोर्चाचे नेतृत्व पूर्व विदर्भ समन्वयक डॉ. रमेशकुमार गजबे, राज्य कार्यकारिणी सदस्य कुशल मेश्राम, पूर्व विदर्भ समन्वयक अरविंद सांदेकर, जिल्हा प्रभारी राजेश बोरकर, जिल्हाध्यक्ष पुराणिक गोंगले, सोमाजी गोंडाणे, जिल्हा कार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे, महिला जिल्हा अध्यक्ष कविता गौरकार, चंद्रपूर महानगराध्यक्ष बंडू ठेंगरे, महिला आघाडी महानगराध्यक्ष तनुजा रायपुरे, महानगर कार्याध्यक्ष सतीश खोब्रागडे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे, निखील रतेवार, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष धीरज तेलंग आदी मान्यवर करणार आहेत.