Home Breaking News Chandrapur city@ news • चंद्रपूर शहरातील डॉ. उमेश अग्रवाल यांनी संपवली जीवनयात्रा

Chandrapur city@ news • चंद्रपूर शहरातील डॉ. उमेश अग्रवाल यांनी संपवली जीवनयात्रा

111

Chandrapur city@ news
• चंद्रपूर शहरातील डॉ. उमेश अग्रवाल यांनी संपवली जीवनयात्रा

चंद्रपूर :- चंद्रपूर येथील डॉक्टरांनी जास्त इंजेक्शन डोस घेतल्याने मृतावस्थेत आढळल्याने वैद्यकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या जयंत टॉकीज जवळील चर्चच्या समोर डॉ. उमेश अग्रवाल यांचे साई आय क्लिनिक दवाखाना आहे.त्यांचे घर पण दवाखान्याचे वरती आहे. दरम्यान काल रात्री 8 ते 8.30 वाजता च्या सुमारास एक रुग्ण आला असता डॉक्टरांना बोलावण्यासाठी अटेंडेंटने घरी असलेल्या डॉक्टरांना हाक दिली पण आवाज ऐकू येत नसल्याने त्यांनी बेडरूम मधे बघितले असता डाॅ. अग्रवाल आपल्या बेडरूम मधे झोपून असल्याचे दिसले तेंव्हा त्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा श्वास बंद झाल्याचे दिसले. त्यांनी डॉ. अग्रवाल च्या समोर असलेल्या डॉ. शिरीष चौधरी यांना बोलावले असता ते मरण पावले असल्याचे जाहीर केले. यावेळी इंजेक्शन डॉ. अग्रवाल च्या उशाशी पडून होते यावरून ते इंजेक्शन घेऊन डॉ. अग्रवाल यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. त्यांची पत्नी सुध्दा डॉक्टर आहे. ते डेंटिस्ट आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार डॉ. अग्रवाल मानसिक रोगाने पीड़ित होते.