Home Breaking News Chandrapur dist@ news • दोन्ही दलीत युवकांच्या हत्येची सीबीआय मार्फत चौकशी करावी...

Chandrapur dist@ news • दोन्ही दलीत युवकांच्या हत्येची सीबीआय मार्फत चौकशी करावी ! • तोगरे कुटूंबांचे चंद्रपूरात बेमुदत धरणे आंदोलन! ! • आंदोलनचा आज पाचवा दिवस • विदर्भ मुक्ती युवा मोर्चाने दिला आंदोलनला पाठिंबा!

235

Chandrapur dist@ news
• दोन्ही दलीत युवकांच्या हत्येची सीबीआय मार्फत चौकशी करावी !
• तोगरे कुटूंबांचे चंद्रपूरात बेमुदत धरणे आंदोलन! !
• आंदोलनचा आज पाचवा दिवस
• विदर्भ मुक्ती युवा मोर्चाने दिला आंदोलनला पाठिंबा!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:अतिदुर्गम भागाच्या जिवती तालुक्यातील दोन दलीत तरुणांच्या हत्येची सीबीआय मार्फत सखोल चौकशी करून या घटनेतील आरोपींवर ॲट्रासिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलन समितीने केली असून याच मागणीच्या अनुषंगाने तोगरे कुटुंबातील सर्व सदस्य चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि.१०जूलै पासून बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे.
कआज या धरणे आंदोलनचा पाचवा दिवस असल्याचे उपोषण कर्त्यांनी या प्रतिनिधीशी काल बोलताना सांगितले.दरम्यान या आंदोलनाला विदर्भ मुक्ती मोर्चाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.संतोष शिंदे व जिवन राजाराम तोगरे या दोन्ही तरुण युवकांची आत्महत्या नसून त्यांची कट रचून हत्या करण्यात आली असल्याचे तोगरे परिवारचे म्हणणे आहे.
जिवन यांच्या हत्येची पिटीगुड्डा पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिका-यांनी व पोलिस कर्मचाऱ्यांनी योग्य चौकशी केली नसल्याचे एकंदरीत निदर्शनास येत असल्याचे लोकस्वराज्य आंदोलनने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.दलीत तरुणांच्या हत्या संदर्भात योग्य चौकशी न केल्यामुळे त्या अधिकाऱ्यांना सहआरोपी करत त्यांचेवर ३०२अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा या शिवाय त्या तरुणांच्या हत्ये संबंधीचुकीचा वैद्यकीय अहवाल दिल्या प्रकरणी त्या अधिकाऱ्यांवर देखिल ३०२गुन्हा दाखल करण्यात यावा . अशी मागणी त्यांनी केली आहे.

मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोकस्वराज्य आंदोलनने दिलेल्या एका निवेदनातून दिला आहे.