Home Breaking News Chandrapur city@ news • मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर यांचा...

Chandrapur city@ news • मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर यांचा सत्कार

266

Chandrapur city@ news
• मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर यांचा सत्कार

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:चंद्रपूर जिल्हा परीषद मधील मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर यांची पदोन्नती व पदोन्नतीने बदली झाल्याने त्यांचा वित्त विभाग जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने जिजाऊ सभागृह चंद्रपूर येथे शाल, श्रीफळ व भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला व पुढील नवीन कार्यालयीन शासकीय सेवेकरीता त्यांना निरोप देण्यात आला.

या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नव्याने रुजु झालेले मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल कुमार गायकवाड व विशेष अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी सुभाष पवार, मनोहर बागडे, मुख्य लेखा परीक्षक चंद्रपूर महानगर पालिका, धर्मराव पेंदाम, अमित मेश्राम उपस्थित होते.

सविता कोहचाडे, विवेक येरमे, स्वाती कुलकर्णी, विनोद खंडाळे, भेजेंद्र मसराम, सूर्यभान मानुसमारे, राजकुमार गहलोत, संग्राम शिंदे,कपिल कलोडे आदींनी अशोक मातकर यांच्या प्रशासकीय कार्याची प्रशंशा केली तसेच त्यांच्या प्रती गौरोवोद्गार काढुन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.

सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे सुत्र संचालन दिपक जेऊरकर यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार पियुष भांदककर यांनी मानले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येंने कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत घोरसारीया, दिपक सहारे, ज्ञानेश्वर कुंभारे मेलविन रायपूरे, अमित घोरसारीया, सुरेंद्र चापडे, मंगेश वाघाडे, सुधाकर देवतळे, नरसिंग यांनी अथक परीश्रम घेतले.