Home Breaking News Ghugus city@ news •शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा- विवेक बोढे

Ghugus city@ news •शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा- विवेक बोढे

107

Ghugus city@ news
•शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा- विवेक बोढे

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस: परिसरातील शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे.

प्रशासनातर्फे एक रुपयात पीकविमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात एक रुपयात ४७ हजार ७५० रुपये प्रतिहेक्टर पीकविमा संरक्षण मिळणार आहे.पीकविमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छीक आहे. शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत ३१ जुलै पर्यंत अशी आहे.

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शेतकऱ्यांना मोफत ऑनलाईन पीकविमा करून देण्यात येत आहे. यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे गणेश कुटेमाटे, शेतकरी प्रदीप जोगी व हरी दुबे उपस्थित होते.