Home Breaking News Chandrapur dist@ news • गरीब विधवा महिलेच्या निवासस्थानी मायाताई ननावरेंची भेट

Chandrapur dist@ news • गरीब विधवा महिलेच्या निवासस्थानी मायाताई ननावरेंची भेट

305

Chandrapur dist@ news
• गरीब विधवा महिलेच्या निवासस्थानी मायाताई ननावरेंची भेट

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: चिमूरच्या इंदिरा नगर निवासी रुपाली सुनील गायकवाड या विधवा महिलेच्या घरी मायाताई ननावरे यांनी नुकतीच भेट देऊन त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या .रुपाली यांची परिस्थिती अत्यंत नाजूक असून त्या तीन मुलीचा सांभाळ करीत आहे .एका छोट्या पडक्या घरात त्या आपल्या कुटुंबासह गेल्या कित्येक दिवसांपासून वास्तव्य करीत आहे.दरम्यान भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे यांनी त्या विधवा महिलेची भेट घेत त्यांनी त्या विधवा महिलेला धीर दिला.चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांच्या कडून आपण आपणांस मदत मिळवू देवू असे आश्वासन मायाताईंने त्या कुटुंबास या वेळी दिले.

या भेटी दरम्यान नाजमा शेख व अलका बोरतवार उपस्थित होत्या.नेरी परिसरात ही असे काही कुटुंबे बघावयास मिळते त्या परिवाराच्या देखिल निवासस्थानी मायाताई ननावरे यांनी भेट देवून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घ्याव्यात असे येथील जनतेची अपेक्षा आहे.