Home Breaking News Ballarpur city@ news • श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे असहाय्य विद्यार्थ्याला मदत

Ballarpur city@ news • श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे असहाय्य विद्यार्थ्याला मदत

316

Ballarpur city@ news
• श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे असहाय्य विद्यार्थ्याला मदत

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर :- श्री.सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे असहाय्य विद्यार्थ्याला मदत करण्यात आले.
बल्लारपूर येथील मुन्ना बोहराजी यांनी बल्लारपूर येथील जनसेवा हिच ईश्वर सेवा मानणारे ना.सुधीर मुनगंटीवार वने, मत्स्य व्यवसाय तथा सांस्कृतिक कार्यें मंत्री यांच्या समाज कार्याची दखल घेत उभारलेली समाजसेवी संस्था सुधीरभाऊ जनसेवा बहुउद्देशीय संस्था यांच्याशी संपर्क साधून केजीएन पब्लिक स्कूल इथे शिकणारा आर्यन मुन या विद्यार्थ्यांच्या आईला कर्करोग झाला असून त्या विद्यार्थ्याच्या घरची परिस्थिती ही अत्यंत बिकट आहे. शाळेची फी भरायला पैसे नसून तसेच शाळेचे पुस्तक घ्यायला सुद्धा पैसे नाही. अशा वेळेस संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर यांनी त्या विद्यार्थ्यांचे घर गाठून त्याच्या पूर्ण वर्षाची फी व पुस्तक घेऊन दिले. या कार्यात मुन्ना बोहराजी व श्रीवास पिसार, मोहित डोंगरे , विनोद कोवे यांनी सहकार्य केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेचे अध्यक्ष उपस्थित होते.