Home Breaking News Bhadrawati taluka @news • बेलोरा- नायगाव खान प्रबंधकांची खाणीतील कामगार नेत्यांशी...

Bhadrawati taluka @news • बेलोरा- नायगाव खान प्रबंधकांची खाणीतील कामगार नेत्यांशी बैठक….विविध विषयांवर केली चर्चा.

122

Bhadrawati taluka @news
• बेलोरा- नायगाव खान प्रबंधकांची खाणीतील कामगार नेत्यांशी बैठक….विविध विषयांवर केली चर्चा.

✍️ मनोज मोडक
सुवर्ण भारत : तालुका प्रतिनिधी, भद्रावती

भद्रावती. वेकोलीच्या वणी क्षेत्रातील बेलोरा -नायगाव ओपन कास्ट कोळसा खाणीत नव्यानेच रुजू झालेले खान प्रबंधक प्रतापसिंह पवार यांनी खाणीतील एचएमएस, आयटक, इंटक, बीएमएस, सीटू ,एससी एसटी कौन्सिलस सिस्टा या कामगार संघटनांचे अध्यक्ष व सचिवांची महत्वपूर्ण बैठक घेऊन खाणीतील विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीमध्ये खाणीतील विविध कार्य तथा येणाऱ्या समस्यांबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. व या समस्या निवारण्यासाठी आवश्यक ती पावले कशी उचलता येईल याविषयी उभय पक्षी संवाद साधण्यात आला. त्याचप्रमाणे सदर खाणितील कार्यक्षमता अबाधित टिकवून ठेवण्यात येईल असेही आश्वासन यावेळी देण्यात आले. सदर खाणिचे पूर्व खान प्रबंधक आर. के. आचार्य यांची सेवानिवृत्ती झाल्यामुळे त्यांच्या ठिकाणी सदर खानीत खान प्रबंधक पदावर प्रतापसिंह पवार हे रुजू झाले आहेत. सदर बैठकीला कामगार नेते आर.एस. निशाद, रवी दिकोंडा, मनोज चिकाटे, किशोर बोबडे, मनोज बिट्टुरवार, चंद्रकांत कापडे, मधुकर झोडे, प्रदीप विश्वकर्मा, सुमन सिन्हा, बीडी खंडारे, आरडी नाईक,अरुण मैश्राम आदींची उपस्थिती होती. यावेळी आयटक संघटनेतर्फे खान प्रबंधक प्रतापसिंह पवार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कारज्ञकरण्यात आला. सदर बैठकीचे सूत्रसंचालन सुनील बिबटे यांनी तर आभार संकेत खोकले यांनी मानले.