Home Breaking News Chandrapur city@ news • मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात आम...

Chandrapur city@ news • मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात आम आदमी पार्टीचे राज्यभरासह चंद्रपूरात निदर्शने !

95

Chandrapur city@ news
• मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात आम आदमी पार्टीचे राज्यभरासह चंद्रपूरात निदर्शने !

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली आहे, हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे .जवळपास तीन महिन्यांचा कालावधी झाला असून केंद्र भाजपा सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकले नाही.आता पर्यंत 140 लोकांनी आपला प्राण गमावला आहे.
दरम्यान मनिपुर मधील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूर बाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही, पंतप्रधान सर्व जग फिरत आहेत. परंतु मणिपूरला गेले नाहीत हा असंवेदनशीलपणा पंतप्रधानाला शोभत नाही. मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही .त्यामुळे तेथील जनता पूर्णता घाबरलेली आहे. या सरकारला पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही.
मणिपूरच्या हिंसाचारा संदर्भात आम आदमी पार्टीने राज्यासह सर्व जिल्ह्यात निदर्शने केली आहेत, केंद्र भाजपा सरकारने लवकरच मनिपुरची परिस्थिती नियंत्रणात आणावी व तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीने आज केली आहे.आजच्या या निदर्शने आंदोलनात आपचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, शहराध्यक्ष योगेश गोखरे, युवा शहराध्यक्ष संतोष बोपचे, शहर सचिव राजू कुडे, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष दोरखंडे, संघटनमंत्री रहेमान खान पठाण, शहर उपाध्यक्ष सुनील सदभय्याजी, सिकंदर सागोरे, शहर सह सचिव सुधीर पाटील, कोषाध्यक्ष स्वप्निल घागरगुंडे, बाबुपेठ प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, अश्रफ सय्यद, प्रशांत रामटेके, दीपक बेरशेट्टीवार नामदेव हनवंते, भिमराव मेंढे, सुजित चेडगुलवार, मधुकर साखरकर, आदीं पदाधिकारी उपस्थित होते.