Home Breaking News Bhadrawati taluka @news • बँक ऑफ बडोदाचा ११६ वा स्थापना दिवस...

Bhadrawati taluka @news • बँक ऑफ बडोदाचा ११६ वा स्थापना दिवस वृक्षारोपण समारोहाने साजरा

132

Bhadrawati taluka @news
• बँक ऑफ बडोदाचा ११६ वा स्थापना दिवस वृक्षारोपण समारोहाने साजरा

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती :बँक ऑफ बडोदा चा ११६ वा वर्धापन दिवस भद्रावती पब्लिक स्कूलमध्ये वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात मुख्याध्यापिका सुजाता उपगन्लावार यांचे हस्ते वृक्षारोपण पार पडले.
नंतर बँक शाखेत संस्थापक सर सयाजीराव गायकवाड (तृतीय) यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून माल्यार्पन करण्यात आले. यावेळी डॉ. माला प्रेमचंद , आशा कौशल , दिलीप ठेंगे , सुजाता उपगन्लावार , शाखा व्यवस्थापक अतुल ठावरी, वरिष्ठ लिपिक अतुल जाधव , रोकड अधिकारी सुशांत गावंडे, नितीन चेंदे, रामदास मते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बँक सह व्यवस्थापक मनीषा शेंडे, लिपिक शिखा अग्रवाल , साहिल नागपूरे, धनराज लांडगे इत्यादींनी परिश्रम घेतले.