Home Breaking News Bhadrawati taluka @news • डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणार्या श्रीमती आशा...

Bhadrawati taluka @news • डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणार्या श्रीमती आशा जयस्वाल यांच्या कायदेशीर कारवाई करून.. दारू विक्री व बियरबार परवाने रद्द करा ! • भिम आर्मी भद्रावती तर्फे पोलिसांना देण्यात आले निवेदन

151

Bhadrawati taluka @news
• डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणार्या श्रीमती आशा जयस्वाल यांच्या कायदेशीर कारवाई करून.. दारू विक्री व बियरबार परवाने रद्द करा !

• भिम आर्मी भद्रावती तर्फे पोलिसांना देण्यात आले निवेदन

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधी, भद्रावती

भद्रावती :- देशी दारुच्या चिल्लर विक्रीच्या दुकानामध्ये मुतरिच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब यांचे भव्य दिव्य असलेल्या बॅनरवर मुत्रविसर्जन करायला लावणाऱ्या मालक श्रीमती आशा अरविंद जयस्वाल यांचा देशी दारु विक्रीचा व इतर २ बिअर बारचे परवाना रद्द करुन त्यांच्यावर कायदेशिर कठोर कारवाई करण्याबाबत त्या संबंधात आज दिनांक 22/07/2023 रोजी भीम आर्मी भद्रावती च्या माध्यमातून मा पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे साहेबाना निवेदन देण्यात आले होते त्यावेळेस उपस्थित तालुका प्रमुख राजरतन पेटकर,उपतालुका प्रमुख अनिकेत रायपूरे, तालुका प्रभारी अन्वरभाई शेख, तालुका महासचिव सिद्धार्थ बुरचुंडे, शहर अध्यक्ष सचिन नारायने, शहर उपाध्यक्ष सोनू सिग, शहर महासचिव, थॉमस दुधे, शहर मीडिया प्रभारी सुरज कांबळे इत्यादी कार्यकर्ते हजर होते व
उपरोक्त विषयाच्या अनुषंघाने आपणास कळविण्यात येत आहे की, दिनांक १६/०७/२०२३ ला स्थित मेजर गेट जवळ सिमराज बारच्या लगत देशी दारुचे चिल्लर विक्रीचे दुकान आहे. काल काही तरुण तिथे मद्य प्राशन करायला गेले असता त्यांना देशी दारुच्या मुत्रिषरामध्ये डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य बॅनरवर काही लोकांना मुत्रविसर्जन करताना बघितले. ही बाब हेतुपुरस्पर केलेली असून काही युवकांच्या लक्षात आली असता युवक संबंधीत घटनेचा जॉब विचारायला गेले असता परवानाधारक यांनी या बाबीला मज्जाव करीत शिवीगाळ केली. हा विषय संपूर्ण आंबेडकरी चळवळीतील संघटनाना हेलावून सोडणारा आहे. तेव्हा आपणास या निवेदनाव्दारे सुचित करण्यात येते की, पुढील ८ दिवसाच्या आत जर परवानाधारकाचे परवाने रद्द करण्यात आले नाही तर भिम आर्मी (भारत एकता मिशन) तर्फे तिव्र स्वरुपाचे आंदोलन केल्या जाईल.