Home Breaking News Bhadrawati taluka @news • मणिपुर महिला हिंसाचार प्रकरणी भद्रावतीत तीव्र पडसाद...

Bhadrawati taluka @news • मणिपुर महिला हिंसाचार प्रकरणी भद्रावतीत तीव्र पडसाद •वंचित बहुजन आघाडी व गोंडवाना एकता समिती चे जोरदार निदर्शने

296

Bhadrawati taluka @news
• मणिपुर महिला हिंसाचार प्रकरणी भद्रावतीत तीव्र पडसाद

•वंचित बहुजन आघाडी व गोंडवाना एकता समिती चे जोरदार निदर्शने

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती- : मणिपुर मध्ये महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढून बलात्कार आणि हत्या करण्यात आली.त्या बाबतीत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महिला बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी अजूनही मणिपुर महिला कांड प्रकरणी आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही. प्रधानमंत्री जग फिरत आहेत आणि मणिपुर ला गेले नाहीत.मणिपुर चे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही. भाजपाने देशात भितीचे वातावरण निर्माण केले आहे. संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
आज भद्रावतीत स्थानिक तहसिल कार्यालय परिसरात वंचित बहुजन आघाडी व गोंडवाना एकता समिती तर्फे या घटनेचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी जोरदार निदर्शने करित मणिपुर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी.तसेच आरोपी वर त्वरित कायदेशीर करून फाशी ची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी भद्रावती चे तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातून राष्ट्रपती कडे करण्यात आली.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे राज्य कार्यकारिणी सदस्य कुशल मेश्राम सह महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा संध्या पेटकर, नगरसेविका राखी रामटेके,सिमा ढेंगळे,लता टिपले, जिल्हाध्यक्ष कविता गौरकार, उपाध्यक्ष कपुरदास दुपारे सह गोंडवाना एकता समिती चे पदाधिकारी सह अनेक कार्यकर्ते या आंदोलन मध्ये सहभागी झाले होते.