Home Breaking News Ghugus city@ news • लाॅईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी व लॉयड्स...

Ghugus city@ news • लाॅईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी व लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन द्वारे तीन शाळेच्या विद्यार्थांना आवश्यक साहित्य वितरण

80

Ghugus city@ news
• लाॅईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी व लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन द्वारे तीन शाळेच्या विद्यार्थांना आवश्यक साहित्य वितरण

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : दि.१८ जुलै २०२३ मंगळवार रोजी लाॅयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड तसेच लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशन द्वारे भर पावसात श्री. साईबाबा ग्रामीण विकास संस्था,गडचिरोली द्वारा संचालित प्रियदर्शिनी कन्या विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय घुग्घुस, एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा तसेच इंदिरागांधी विद्यालय पडोली येथे शिक्षणासाठी विद्यार्थी,विद्यार्थिनी ला आवश्यक व गरजू साहित्य कंपनीच्या सी.एस.आर निधीतून वितरण करण्यात आले,व घुग्घुस येथुन १८ किलोमीटर अंतरावरील इंदिरा गांधी विद्यालय पडोली येथे साहित्य वितरण करण्यात आले.

कन्या शाळेतील प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थींनी यांने लाइट्स कंपनीतील प्रमुख हेड संजय कुमार, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी, एच.आर.उपाध्यक्ष पवन मेश्राम, सीएसआर व्यवस्थापक तरूण केशवानी, आदित्य सिंग,रतन मेढा व लाइट्स इन्फिनिट फाउंडेशनचे नम्रपाली गोंडाणे यांचे स्वागत लेझीमच्या तालात नाचून पुष्पगुच्छ देवुन सम्मान करून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रम उत्साहात समारंभ पार करून व तसेच भरपावसात घुग्घुस वरुन पाच किलोमीटर अंतरावरील पांढरकवडा न्यू इंग्लिश हायस्कूल येथील विद्यार्थीला गरजू आवश्यक साहित्य वितरण केले.
शाळेला संगणक, विज्ञान प्रयोग, पुस्तकालय, बॅग, नोटबुक, कंपास देण्यात आले.तसेच मुलींच्या शाळेत गैरसोय होणारी सोय लाइट्स मेटल ने दूर करून सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम उत्साहात कण्यासाठी शेड बनुन दिले,इंदिरा गांधी विद्यालय पडोली या शाळेला पण देण्यात आले.
लाइट्स इन्फिनिट फाउंडेशनचे नम्रपाली गोंडाणे यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना आपले मनोगतात सांगितले कि शिक्षकाबद्दल समाजामध्ये कायम आदराचे आणि मान-सन्मानाचे स्थान असते. यात शिक्षकाचा भय, चिंता यांच्या गाठी शिक्षकांच्या सहज संवादाने दूर होऊ शकतात. विदयार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वत:च्या आयुष्यात नैतिक मूल्याचे आचरण करून समाजासमोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडविणारे शिल्पकार टिकवून ठेवण्यास शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक शिकवण शिक्षक रुजवू शकतो.

जगात कुठेही गुरू आणि शिक्षकांचा आदर केला जातो, काहींना अपार प्रेम दिले जाते, तर काही शिक्षक हे आयुष्यावरच केवळ प्रभाव टाकत नाही तर त्यांच्या जीवनातही स्थित्यंतर घडवून आणतात. शिक्षक विदयार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास सज्ज असतात. जी भावी स्वप्ने (मुलांनी उराशी बाळगलेली असतात ती समजून घेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. शिक्षकाचे काम हे मार्गदर्शक, समुपदेशकाचे किंवा दिशादर्शकाचे असते.