Home Breaking News ◻️🔸पोरा स्वप्नात ये ना !

◻️🔸पोरा स्वप्नात ये ना !

250

◻️🔸पोरा स्वप्नात ये ना !

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

◻️♦️मनातले भाव तू
थोडे जरा जाणं ना,
प्रत्यक्षात नाही तर
पोरा स्वप्नात तरी येना.(१)

◻️♦️सांजवेळ होता प्रिया
नजर फिरे चोहीकडे,
विरहात तुझ्या माझे
ह्दय सतत धडधडे.(२)

◻️♦️पाणावल्या‌ नजरेला
थोडी आस दाव ना,
डोळ्यासमोर साक्षात नको
पण स्वप्नांत तरी भेट ना.(३)

◻️♦️तुझ्या सोबत स्वप्नांचा
बांधिला मी हिंदोळा,
स्वप्नात तुझ्या रंगण्याचा
लागला मला छंद खुळा.(४)

♦️◻️ज्याला लावला जीव
तोच माझ्या स्वप्नी वसे,
हृदयाच्या कप्प्यात मग
दुजा कुणी सामावू कसे?(५)

♦️◻️तुझ्या समवेत स्वप्नांत
स्वप्न मी रंगविले,
स्वप्नातच झोपाळ्यावर
घरकुल आपले सजविले.(६)

♦️◻️मनीच्या भावना माझ्या
साद तुला नेहमी घाली,
पोरा एकदा स्वप्नात भेटून
येवू दे माझ्या गालावर लाली.(७)

◻️🔸◻️वैशाली राऊत सहज सुचलं सदस्य नागपूर