Home Breaking News Bhadrawati taluka @news • शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा...

Bhadrawati taluka @news • शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस जनसेवा दिवस म्हणून साजरा करणार : रविंद्र शिंदे

50

Bhadrawati taluka @news
• शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस जनसेवा दिवस म्हणून साजरा करणार : रविंद्र शिंदे

✍🏻मनोज मोडक
सुवर्ण भारत : तालुका प्रतिनिधी, भद्रावती

भद्रावती : हिंदुद्ददयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या धोरणानुसार शिवसेना हा पक्ष समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी जिवाचे रान केले. हिंदुद्ददयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या संदेशाचा पाठपूरावा करीत पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी, शेतमजुर आणि समाजातील सर्वच घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. उद्या २७ जुलै रोज गुरूवारला शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्याने पक्षाच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात येईल. त्यांचा वाढदिवस ‘जनसेवा दिवस’ म्हणून साजरा करणार असल्याचे प्रतिपादन पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले.
          सामाजिक उपक्रमांमध्ये वैद्यकिय आर्थिक सहकार्य, कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप, शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, दिव्यांगाणा तीनचाकी सायकल वाटप आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
           दि. २२ जुलै रोजी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पक्षाच्या वरोरा येथील “शिवालय”मध्यवर्ती  कार्यालयात पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त्य विविध सामाजिक कार्यक्रमांचे  नियोजन व आढावा घेण्याकरीता आयोजित बैठकीत शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना रविंद्र शिंदे बोलत होते.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, शहरप्रमुख घनश्याम आस्वले, प्रशांत कारेकर, मायाताई नारळे, आश्लेषा जीवतोडे, खेमराज कुरेकार, वरोरा-चिमुर-ब्रम्हपुरीच्या युवती जिल्हा अधिकारी  प्रतिभा माडंवकर, प्रा. प्रीती पोहाणे, प्रतिभा मांडवकर, अभिजीत कुडे, निखिल, मांडवकर, अनिल सिंग, शुभांगी डाखरे, स्वाती ठेंगणे, चंदू जीवतोडे, मंगेश भोयर, सृजन मांढरे, युवराज इंगळे, तेजस्विनी चंदनखेडे, ज्योती पोयाम, शिव गुडमल, प्रणाली मडकाम, नेहा बनसोड, गौरव नागपुरे, सीमा लेडांगे, पुनम सरपाते, ज्योती पोयाम, स्नेहा किन्नाके, भावना खोब्रागडे, महेश निखाडे, मनोज पापडे, प्रज्वल जाणवे, सौरभ खापने, निखिल मांडवकर, राहूल मालेकर आणि  गौरव नागपुरे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी फार मोठ्या संख्येत उपस्थित होते.