Home Breaking News Pombhurna taluka@ news • विज पडून मजूर महिला ठार; 4 गंभीर जखमी...

Pombhurna taluka@ news • विज पडून मजूर महिला ठार; 4 गंभीर जखमी • पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा येथे शेतशिवारात घडली घटना

270

Pombhurna taluka@ news
• विज पडून मजूर महिला ठार; 4 गंभीर जखमी

• पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा येथे शेतशिवारात घडली घटना

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

पोभूर्णा:जिल्हा प्रशासनाने हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिनांक 26 व 27 ला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून ऑरेंज अलर्ट जारी केला व नागरिकांना स्वत:च्या संरक्षणा करीता सुचना जाहीर केल्या होत्या. परंतु सध्या शेतकऱ्यांचे रोवणीचे दिवस असल्याने पाऊस असो वा काही असो शेती हंगाम चालू आहे. दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे रोवणीला गेलेली अर्चना कुळमेथे ही शेतात रोवणीचे काम करीत असताना अर्चना हिचेवर विज कोसळली तिला उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे नेले असता डॉक्टर ने मृत घोषित केले व इतर आजूबाजूला असलेले मजूर खुशाल ठाकरे, वर्षा सोयाम, रेखा सोनटक्के व सुनंदा इंगोले ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
तालुक्यातील वेळवा येथील अर्चना ही वडिलांचे शेतात इतर मजूरासह धान रोवणीला गेली होती. परंतु निसर्गाने काळाचा घाला घालत विज कोसळून अर्चनाचा मृत्यू झाला व शेतात काम करणाऱ्या मजूर महिलांनाही विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचाराकरीता पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असून काहींना चंद्रपूर रुग्णालयात रेफर करणार असल्याचे सांगितले जात आहे.
शेतात काम करीत असताना नैसर्गिक मृत्यू ओढावल्याने प्रशासनाच्या वतीने तात्काळ मदत देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. व जखमींना मोफत उपचार आणी आर्थिक मदतीची मागणी होत आहे.