Jivati taluka@ news
• मतीमंद तरुणीवर अत्याचार , आरोपीला अटक
• अतिदुर्गम जिवती तालुक्यातील घटना
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:किरण घाटे
जीवती:चंद्रपूर जिल्हा अंतर्गत येत असलेल्या जिवती तालुक्यातील उप पोलिस स्टेशन पिट्टीगुडाच्या हद्दीतील आंबेझरी येथील एका ४४ वर्षीय नराधमाने आदिवासी कोलाम जमातीच्या एका १९ वर्षीय मतिमंद मुलींवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
४४वर्षिय शरफोदीन शबीर शेख असे आरोपीचे नाव असल्याचे कळते.या घटने बाबत उप पोलीस स्टेशन पिट्टीगुडा येथे सोमवारी रात्री उशिरा सदरहु आरोपी विरुद्ध कलम ३७६ (१), ३७६ (२) (जे), ३७६ (२) (एल), ४५० भांदवी सहकलम ३ (I) (W) (i) (ii), ३ (२) (va) अनुसूचित जाती, जमाती अत्याचार संरक्षण अधिनियम १९८९ सुधारणा २०१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. दरम्यान त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
घटनेतील पिडीत १९ वर्षीय मतिमंद मुलगी घरात एकटीच असल्याची संधी पाहून पिडीत मुलगी मतिमंद आहे हे माहीत असतानाही तिच्या मतिमंदाचा फायदा घेऊन ४४ वर्षीय नराधमाने त्या पिडीत मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना तालुक्यातील आंबेझरी गावात घडली. पुढील तपास एसडीपी साखरे करीत असल्याचे समजते.
