Home Breaking News Ghugus city@ news • लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी व...

Ghugus city@ news • लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी व लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनचा उपक्रम • घुग्घुस परिसरातील दोन गावाला महिला मासिक पाळी दिवस कार्यक्रम आयोजित

304

Ghugus city@ news

• लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी व लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनचा उपक्रम

• घुग्घुस परिसरातील दोन गावाला महिला मासिक पाळी दिवस कार्यक्रम आयोजित

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड अंतर्गत लाइट्स इन्फिनिट फाउंडेशन द्वारे घुग्घुस परिसरातील दोन गावे एक तर उसगांव दुसरी म्हतारदेवी येथे महिला मासीक पाळी दिवस आयोजित करण्यात आले.

या दोन्ही गावातील शेकडो महिल्यानी सहभाग घेतले,व त्यात महिला ना मासीक पाळीचे समस्या होतात त्याविषयी दोन्ही गावचे सरपंच उसगांवचे निवीता ठाकरे व म्हातारदेवीचे संध्या पाटील व सदस्य यांच्या सबोत संघटनात्मक चर्चा करण्यात आले.

लाइट्स इन्फिनिट फाउंडेशनचे नम्रपाली गोंडाणे सांगितले की,विकसनशील देशांमध्ये, मासिक पाळीच्या स्वच्छता सामग्रीच्या महिलांच्या निवडी सहसा खर्च, उपलब्धता आणि सामाजिक नियमांनुसार मर्यादित असतात. पुरेशा स्वच्छता सुविधा आणि स्त्री स्वच्छता उत्पादनांची उपलब्धता महत्त्वाची आहे परंतु महिला आणि मुलींना पुरेसे शिक्षण देण्यासाठी सुरुवातीची चर्चा समान महत्त्वाची आहे. संशोधनात असे आढळून आले आहे,की मासिक पाळीच्या स्वच्छता व्यवस्थापन उत्पादनांमध्ये प्रवेश नसल्यामुळे मुलींना त्यांच्या मासिक पाळी दरम्यान शाळेतून घरी ठेवता येते.
मासिक पाळी स्वच्छता दिवस हा सोशल मीडियासह माध्यमांमध्ये माहिती प्रसिद्ध करण्याचा आणि धोरणात्मक संवादात निर्णय घेणाऱ्यांना गुंतवून ठेवण्याचा एक प्रसंग आहे. जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक धोरणे आणि कार्यक्रमांमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी लाइट्स मेटल्स कंपनीचे व्यवस्थापनाच्या एकात्मतेसाठी समर्थन करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
गावातील व परिसरातील शेकडो महिल्यांनी सहकार्य राहुन कार्यक्रम यशस्वी करण्यात आले.
यावेळी मुख्य अतिथी कंपनीचे प्रमुख हेड श्री.संजयकुमार, मानव संसाधन उपाध्यक्ष पवन मेश्राम, उत्पादन उपाध्यक्ष गुणाकार शर्मा, कॅपेसिटिव्ह पाॅवर प्लांट उपाध्यक्ष विनोद पांडे,व्यावसायिक प्रमुख पुलक गोयल, खाते एजीएम प्रमुख विकास वर्मा, सी.एस.आर. व्यवस्थापक तरूण केशवानी,आदित्य सिंग,रतन मेडा दोन्ही गावातील सरपंच्या व सदस्य तसेच गावातील महिला उपस्थित होते.