Home Breaking News Bhadravati taluka@ news • माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे वाढदिवसा...

Bhadravati taluka@ news • माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे वाढदिवसा निमित्त रविंद्र शिंदे च्या वतीने दिव्यांगांना तिन चाकी सायकल तसेच कर्ण यंत्र वितरण

152

Bhadravati taluka@ news
• माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे वाढदिवसा निमित्त रविंद्र शिंदे च्या वतीने दिव्यांगांना तिन चाकी सायकल तसेच कर्ण यंत्र वितरण

✍🏻मनोज मोडक
सुवर्ण भारत: तालुका प्रतिनिधी, भद्रावती

भद्रावती – बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला मंत्र 80% समाजकारण आणि 20% राजकारण च्या माध्यमातून पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त भद्रावती तालुक्यात सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त भद्रावती येथे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे व भद्रावती तालुका प्रमुख नंदु पढाल आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत दिव्यांगांना तीनचाकी सायकल वितरण व कर्णयंत्र वाटप करण्यात आले. तसेच गजानन महाराज मतिमंद विद्यालय भद्रावती येथे मतिमंद विद्यार्थ्यांना भोजनदान देण्यात आले तसेच भद्रावती तालुक्यातील पुर पिडीत व्यक्तींना उपयोगी वस्तू चे वाटप करून उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल,तालुका संघटीका प्रा.अश्र्लेषा भोयर,शहर प्रमुख घनश्याम आस्वले,राहूल मालेकर,गौरव नागपूरे,ज्ञानेश्वर डुकरे,अरूण घुग्गुल,प्रशांत कारेकार व पदाधिकारी उपस्थित होते.