Home Breaking News Vani taluka@ news •संपादकावर भ्याड हल्ला ! • पत्रकारांना पोलिसांकडून संरक्षण मिळेल...

Vani taluka@ news •संपादकावर भ्याड हल्ला ! • पत्रकारांना पोलिसांकडून संरक्षण मिळेल काय ?

518

Vani taluka@ news
•संपादकावर भ्याड हल्ला !
• पत्रकारांना पोलिसांकडून संरक्षण मिळेल काय ?

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

वणी:बातमी प्रकाशित का केली नाही म्हणून एका इसमाने “आपली वणी न्यूज चैनलचे” संपादक वैभव पोटवडे यांचेवर भ्याड हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे .यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तहसिल अंतर्गत येत असलेल्या डोंगरगांव (वि.) येथील मूळ रहिवाशी असलेल्या वैभव पोटवडे यांचे (स्वमालकीचे) युट्यूब न्यूज चैनल असून ते या माध्यमातून समाजातील ज्वलंत समस्या व प्रश्न मांडण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून करीत आहे.
मंगळवार दि. २५ जुलै रोजी सायंकाळी अंदाजे ७.४० वाजताच्या दरम्यान संपादक पोटवडे हे गावातीलच आपल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी त्यांच्या घराकडे जात असताना चेतन बाळकृष्ण परचाके यांनी संपादक यांना आवाज देऊन बोलाविले व अश्लील शिवीगाळ केली .गावतील रेशन दुकानदारची बातमी का लावत नाही ? असे म्हणत तो वैभव पोटवडे यांचे अंगावर धावून आला .एव्हढेच नाही तर त्यांना अश्लील शब्दात ‌शिवीगाळ करून त्याने मारहाण केली. हा सर्व प्रकार गावातील लोक आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघत होते . पण कोणीही त्यांच्या मदतीला धावून आले नाही. घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.नंतर वणी पोलिस स्टेशनचे पोलिस पथक त्यास पोलिस स्टेशनला घेऊन गेले. दरम्यान आपली वणी न्युज व यूट्युब चॅनलचे संपादक वैभव पोटवडे यांनी घडलेल्या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीवर कलम ३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.उपरोक्त घटनेचा अनेकांनी निषेध नोंदविला असून पोलिसांनी पत्रकारांना वेळीच संरक्षण द्यावे अशी मागणी आता सर्व स्तरावरुन होवू लागली आहे.

■व्हॉईस ऑफ मिडिया संघटनेची भूमिका■

संपादकावर झालेल्या या भ्याड हल्ल्याबाबत पोलिसांनी आरोपीवर कार्यवाही न केल्यास व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्हॉईस ऑफ मिडियाचे वणी तालुका अध्यक्ष मनोज नवले यांनी दिला आहे .