Home Breaking News Chimur taluka@ news • शेतात वीज पडून एक ठार तर एक...

Chimur taluka@ news • शेतात वीज पडून एक ठार तर एक गंभीर जखमी • नेरी जवळील घटना

920

Chimur taluka@ news
• शेतात वीज पडून एक ठार तर एक गंभीर जखमी
•नेरी जवळील घटना

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चिमूर:चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील
नेरी या गावा लगत असलेल्या मोखाळा येथील एकनाथ पिसे यांच्या शेतात आज गुरुवार दि.27 जुलैला दुपारी चार ते पाच वाजता दरम्यान धानाची रोवणी करत असताना शेतात वीज पडली त्यात एक महिला मृत्यूमुखी पडली तर एक महिला गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली.शेतकरी एकनाथ पिसे यांच्या शेतात आज रोवणीचे काम सुरू असल्यामुळे नेरी येथील काही मजूरीच्या महिला व पुरुष या शेतात काम करण्यासाठी गेले होते.
अश्यातच पावसाला सुरुवात झाली .मजूर काम करीत असतानाच शेतामध्ये वीज कोसळली त्यात एक 70 वर्षीय महिला जागीच गतप्राण झाली तर तिची स्नुषा जखमी झाली. जखमीला ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे भरती करण्यात आले तसेच मृत्यू पावलेल्या महिलेचा पंचनामा करण्यासाठी पोलिस स्टेशन चिमूरचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान नेरी राजस्व मंडळाचे मंडळ अधिकारी कुंभरे घटनास्थळी दाखल झाले आहे त्यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आहे. यातील वृत्त लिहीपर्यत जखमीचे नाव कळू शकले नाही.