Home Breaking News Chandrapur city @news • पुरवठा सहाय्यकाची कार नाल्याच्या पाण्यात वाहून गेली...

Chandrapur city @news • पुरवठा सहाय्यकाची कार नाल्याच्या पाण्यात वाहून गेली ! • बेरडी नाल्यावर घडली घटना!

549

Chandrapur city @news
• पुरवठा सहाय्यकाची कार नाल्याच्या पाण्यात वाहून गेली !
• बेरडी नाल्यावर घडली घटना!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभूर्णा आक्सापूर मार्गावरील बेरडी नाल्यात आज (शुक्रवार दि.२८जूलैला) सकाळच्या वेळेस पुलावरुन एक कार वाहुन गेल्याची दूदैवी घटना घडली.दरम्यान या घटनेतील ती कार घटनास्ळावरुन एक किलोमीटर अंतरावर मिळाली असून कार चालकाचा अद्याप शोध लागला नाही.पुरवठा सहाय्यक अमित पांडुरंग गेडाम यांच्या मालकीची ही कार असल्याचे चौकशी अंती कळले .या घटनेबाबत विश्वासनिय सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार असे कळते कि अमित गेडाम हा गेल्या पाच सहा वर्षांपासून तहसिल कार्यालय पोंभूर्णा येथे कार्यरत आहे.त्याचे कडे सध्या गोडाऊनचा कार्यभार होता .या शिवाय त्याचेकडे गोंडपिपरी येथील गोडाऊनचा अतिरिक्त कार्यभार होता.बेरडी नाल्याच्या पाण्यात ती कार वाहून गेल्याची चर्चा या परिसरातील नागरिकांत केल्या जात आहे.या दुदैवी घटनेतील ती कार एक किलोमिटर अंतरावर मिळाली असून ती कार कोण चालवित होता व त्या कार मध्ये कोण कोण बसले होते हे मात्र कळू शकले नाही.उशिरा पर्यंत शोध पथकाची‌ शोध मोहीम जारी होती .