Home Breaking News Ballarpur taluka@ news • नांदगाव पोडे येथील शिवार जलमय गाव मात्र कोरडाच

Ballarpur taluka@ news • नांदगाव पोडे येथील शिवार जलमय गाव मात्र कोरडाच

189

Ballarpur taluka@ news
• नांदगाव पोडे येथील शिवार जलमय गाव मात्र कोरडाच

✍️संजय घुग्लोत
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपूर :- तालुक्यातील नांदगाव पोडे येथे मागील पाच दिवसांपासून नळ योजना तांत्रिक कारणामुळे बंद असून लोकांना पाण्याकरीता भटकत राहण्याची वेळ आली आहे.
नांदगाव पोडे साधारणता 4 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणारे गाव आहे. ग्रामपंचायत येथे अधिकारि पदावर रुजू असताना सुद्धा गावाकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. ग्रामीणांच्या प्राथमिक गरजाकडे सुद्धा लक्ष नाही अशात ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी खटाटोप करीत आहे.

गावात नळ योजना असून सुद्धा चालू वर्षात 3 ते 4 वेळा तांत्रिक अडचनिमुळे नळ योजना बन्द होती नागरिकांसमोर वारंवार हे संकट उभे राहत आहे. यासाठी कोणतेच शासकीय अथवा राजकीय पुढारी पुढाकार घेऊन नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे येतांना दिसत नाही आहे.
अशातच ग्रामपंचायत सरपंच सौ प्राजक्ता उरकुडे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला मागील काही महिन्यापासून उपसरपंच पद रिक्त आहे अशात ग्रामस्थांनी आपल्या समस्या कुणासमोर मांडाव्या हा प्रश्न चिन्ह ग्रामस्थान समोर उभा आहे.शासनाने अडचणीचे निवारण करून ग्रामस्थांना योग्य न्याय द्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.