Home Breaking News Bhadrawati taluka@news यशवंत राव शिंदे महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल...

Bhadrawati taluka@news यशवंत राव शिंदे महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्मृती दिन साजरा करण्यात आले

84

Bhadrawati taluka@news
यशवंत राव शिंदे महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्मृती दिन साजरा करण्यात आले

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती:- यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन संपन्न झाला. संपूर्ण देशात हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्रमुख अतिथी प्राध्यापक सौ उज्वला वानखेडे, डॉ. ज्ञानेश हटवार, किशोर ढोक
व्यासपीठावर उपस्थित होते.
सदैव विद्यार्थी प्रिय असलेले व क्षेपणास्त्र क्षेत्रात उत्तुंग कामगीरी करणाऱ्या, भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून कलाम यांच्या जीवनाकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी विद्यार्थ्यांनी वाचनही केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राध्यापक सौ उज्वला वानखेडे यांनी “विद्यार्थ्यांनी एपीजे अब्दुल कलाम यांची प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणावे “असे मार्गदर्शन केले. डॉक्टर ज्ञानेश हटवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना “विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी , नक्कीच यश आपलेच आहे “असे विचार मांडले. याप्रसंगी किशोर ढोक यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी जान्हवी सूर्यवंशी हीने केले तर आभार प्रदर्शन कुमारी प्रणाली येडमे हिने केले.
यावेळी प्राध्यापक कमलाकर हवाईकर, प्रेमा पोटदुखे, संगीता जक्कुलवार प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम टोंगे, निलेश कुळमेथे, जगझाप, लव भोयर आदी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.