Home Breaking News Ballarpur city@ news • राजू वानखेडे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार साठी चंद्रपूर...

Ballarpur city@ news • राजू वानखेडे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार साठी चंद्रपूर जिल्ह्यातून राज्य पातळीवर

94

Ballarpur city@ news

• राजू वानखेडे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार साठी चंद्रपूर जिल्ह्यातून राज्य पातळीवर

✍️पारिश मेश्राम
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर: राजू वानखेडे सहायक शिक्षक जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२३ साठी चंद्रपूर जिल्ह्यातून निवड करून राज्य पातळीवर पाठवण्यात आले आहे. दिनांक: २४/०७/ २०२३ रोजी चंद्रपूर डायट मध्ये झालेल्या मुलाखतीत जिल्हा निवड समितीने त्यांचे नाव राज्यपातळीवर पाठवीले आहे.
याबाबत डाॅ. अशोकराव जीवतोडे सचिव चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपुर, बी.बी. भगत मुख्याध्यापक तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
राजू वानखेडे यांनी जिल्हा निवड समितीचे कल्पना चव्हाण मॅडम माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, राजकुमार हिवारे प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, गो. थुटे यांचे आभार व्यक्त केले आहे.