Home Breaking News Ballarpur city@ news • संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न

Ballarpur city@ news • संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न

157

Ballarpur city@ news
• संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न

✍️संजय घुग्लोत
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपूर :- संजय गांधी निराधार अनुदान योजनेची पहिली बैठक दि. २७ जुलै २०२३ रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय, बल्लारपूर सभागृहात संपन्न झाली. यावेळी सदर योजनेतील सुमारे ६० लाभार्थ्यांची प्रकरण मंजूर करण्यात आली. त्यात अपंग, निराधार, विधवा, वृद्ध आदी प्रवर्गातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. याप्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष समीर केने, सचिव तहसीलदार कांचन जगताप, सदस्य सौ वैशालीताई जोशी, राजू दासरवार, किशोर मोहुर्ले, सतीश कनकम, मल्लेश कोडारी, रमेश पिपरे, रूमदेव डेरकर, अनिल मोरे यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली.