Home Breaking News Ghugus city@ news • ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त नकोडा येथे आधार...

Ghugus city@ news • ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त नकोडा येथे आधार कार्ड शिबिराचे आयोजन

112

Ghugus city@ news
• ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त नकोडा येथे आधार कार्ड शिबिराचे आयोजन

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

नकोडा: महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचा दि. ३० जुलै रोजी ६१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला या शिबिरात हजारो रक्तदात्यांनी रक्तदान केले
याच दिवसाचे औचित्य साधून मौजा नकोडा येथे माजी समाजकल्याण सभापती तथा संजय गांधी निराधार समितीचे विद्यमान अध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे यांच्या नेतृत्वाखाली दि ३१ जुलै ते ०२ ऑगस्ट तीन दिवसीय आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात नवीन आधार कार्ड काढणे व आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली, शिबिराच्या पहिल्या दिवशी १०३ नागरीकांच्या नावाची नोंदणी झाली असून ३२ जणांचे आधार कार्ड यशस्वीपणे ऑनलाईन सादर करण्यात आले
या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या तीन दिवसात पाचशेच्यावर आधारकार्ड नोंदणी होण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे, ऋषीजी कोवे (माजी सरपंच नकोडा ) किरण बांदुरकर ( सरपंच नकोडा) मंगेश राजगडकर (उपसरपंच नकोडा) रजत तुरानकर ग्रां.पं सदस्य , बाळकृष्ण झाडे भाजपा शहर अध्यक्ष नकोडा पंढरी कोवे (महामंत्री नकोडा) सुचीता बोबडे ( भाजपा महिला अध्यक्ष नकोडा) मधुकर बोबडे (जेष्ठ नेते भाजपा) व गावकरी उपस्थित होते.
या शिबिराला यशस्वी करण्यासाठी नकोडा गावातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.