Home Breaking News Chandrapur city@ news • जनतेची कामे वेळेवर करुन त्यांचा विश्वास संपादन करावा:जिल्हाधिकारी...

Chandrapur city@ news • जनतेची कामे वेळेवर करुन त्यांचा विश्वास संपादन करावा:जिल्हाधिकारी विनय गौडा •चंद्रपूरच्या नियोजन भवनात पार पडला महसूल दिन कार्यक्रम! •शासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान!

199

Chandrapur city@ news
• जनतेची कामे वेळेवर करुन त्यांचा विश्वास संपादन करावा:जिल्हाधिकारी विनय गौडा
•चंद्रपूरच्या नियोजन भवनात पार पडला महसूल दिन कार्यक्रम!
•शासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत :उपसंपादक

चंद्रपूर:नियमात बसत असलेली कामे वेळीच करुन जनतेचा विश्वास संपादन करावा असा मोलाचा सल्ला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी स्थानिक नियोजन भवनात दि. १ऑगस्टला आयोजित महसूल दिन कार्यक्रमात बोलतांना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला . कामाच्या निमित्ताने कार्यालयात येणा-या लोकांशी कर्मचाऱ्यांनी सौजन्यपूर्वक वागावे असे ही ते या वेळी पुढे बोलताना म्हणाले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार,जिल्हा भूमि अधिक्षक प्रमोद गाडगे , अप्पर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू , अप्पर जिल्हाधिकारी देशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम, सह.जिल्हा निबंधक वर्ग -१ चंद्रपूरच्या महिला अधिकारी तंडले आदीं वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार यांनी करुन आजच्या कार्यक्रमाचे महत्व त्यांनी उपस्थितीतांना या वेळी पटवून दिले.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जाॅन्सन व जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख गाडगे यांनी या प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले.चंद्रपूर तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार राजू धांडे व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अव्वल कारकून नितिन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आजच्या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी बांधवांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुरेख संचालन चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिक्षक प्रिती ढूढूलकर यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार अव्वल कारकून शैलेश धात्रक यांनी मानले.शेवटी राष्ट्रगिताने या कार्यक्रमाची सांगता झाली.