Home Breaking News Ghugus city@ news • निराधार ” ताईच्या मदतीला काँग्रेसचा हात’ अन्न –...

Ghugus city@ news • निराधार ” ताईच्या मदतीला काँग्रेसचा हात’ अन्न – वस्त्र सह निवाऱ्याची ही मदत

323

Ghugus city@ news
• निराधार ” ताईच्या मदतीला काँग्रेसचा हात’ अन्न – वस्त्र सह निवाऱ्याची ही मदत

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : ढीवर,भोई समाज वस्ती येथील सवारी बंगला परिसरात राहणारी अर्चना शिवरकर हीचे आई – वडील मरण पावले असून तिच्या शिवाय घरी कुणीच नाही.

याचा परिणाम तिच्या मानसिकतेवर झाला आणि ती मिळेल तर खायची अथवा उपाशीपोटी राहायची घरावरील टीनाचे छत पूर्णता फटल्याने पावसात पूर्ण पाणी घरात अश्या अत्यंत दयनीय स्तिथीत राहत असणाऱ्या अर्चना ताईची माहिती महिला काँग्रेसच्या पदाधिकारी मंगला बुरांडे यांनी महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद व एस.सी.सेल महिला अध्यक्ष दिप्ती सोनटक्के यांना दिली त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राजु रेड्डी यांना संपूर्ण माहिती दिली असता काँग्रेस व महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने सदर ताईला खाण्या – पिण्याचे तैयार साहित्य व किराणा साहित्य ,कपडे भाजीपाला मदत स्वरूपात दिले तसेच तिच्या घराचे छत निर्माण करायचे हे वचन देण्यात आले.

काँग्रेसच्या अनपेक्षित मदतीने अर्चना ताईच्या चेहऱ्यावर हास्य फुलले याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, सुधाकर बांदूरकर,अलीम शेख, रोशन दंतलवार,विशाल मादर,रोहित डाकूर,नुरुल सिद्दीकी,शहजाद शेख,देव भंडारी,आकाश चिलका,रफिक शेख,अरविंद चहांदे,सुनील पाटील,कपील गोगला,साहिल सैय्यद,सन्नी कुम्मरवार, अमित सावरकर,हरीश कांबळे,अंकुश सपाटे,भैय्या भाई, पूनम कांबळे,सुजाता सोनटक्के,प्रिती तामगाडगे,कविता उंदिरवाडे,व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.