Home Breaking News Gadchiroli dist@ news • अखेर जमीन मोजणीच्या कामाला सुरुवात •भाग्यश्री ...

Gadchiroli dist@ news • अखेर जमीन मोजणीच्या कामाला सुरुवात •भाग्यश्री आत्राम यांच्या उपस्थितीत शुभारंभ •आलापल्लीकरांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड मिळणार

335

Gadchiroli dist@ news
• अखेर जमीन मोजणीच्या कामाला सुरुवात
•भाग्यश्री आत्राम यांच्या उपस्थितीत शुभारंभ
•आलापल्लीकरांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड मिळणार

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

अहेरी:-कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर आलापल्ली येथील नागरिकांच्या मालमत्तेबाबत भूमी अभिलेख कार्यालयाकडून पुनर्रचौकशी करून जमीन मोजणीच्या कामाला शुभारंभ करण्यात आले आहे.1 ऑगस्ट रोजी आलापल्लीतील बजरंग चौक येथून जमीन मोजणीच्या कामाला सुरुवात करण्यात आले असून मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या आलापल्लीकरांना आता मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) मिळणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम,आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम,राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,पेसा अध्यक्ष स्वामी वेलादी,पेसा सचिव प्रीती इष्टाम,ग्रा प सदस्य सोमेश्वर रामटेके, ग्रा प सदस्य मनोज बोल्लूवार,पराग पांढरे उपस्थित होते.

आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच संचालक भूमि अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त (नागरी भूमापन) पुणे यांच्याशी संपर्क साधून अहेरी तालुक्यातील आलापल्लीवासीयांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याचे निर्देश दिले होते.त्याअनुषंगाने विष्णु शिंदे उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर प्रदेश नागपूर आणि नंदा आंबेकर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज अंभोरे, शिरस्तेदार तसेच सर्वेयर समय्या बोमनवार यांच्याकडून पुनर्रचौकशी तसेच जमीन मोजणीचे काम केले जात आहे.